इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये मराठी निवृत्त कर्नलचा मृत्यू

राफामध्ये संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षा समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणारे हिंदुस्थानचे निवृत्त कर्नल वैभव अनिल काळे यांचा इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. कर्नल काळे प्रवास करत असलेले वाहन इस्रायली माऱयाचे लक्ष्य झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. मूळचे नागपूरकर असलेले कर्नल काळे हिंदुस्थानी सैन्यातून 2022 मध्ये मुदतपूर्व निवृत्ती घेतल्यानंतर पुण्यात स्थायिक झाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा व्यवस्था विभागात त्यांनी तीन आठवडय़ांपूर्वीच जबाबदारी स्वीकारली होती. वैभव यांचे पार्थिव कैरोमार्गे पुण्यात आणण्यात येणार असून दोन दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात येतील.