
इस्रोअंतर्गत विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (व्हीएसएससी) मध्ये 60 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तंत्रज्ञ बी, ड्राफ्ट्समन आणि फार्मासिस्ट अशा पदांची भरती असून उमेदवाराचे वय किमान 18 ते 35 वर्षे असायला हवे. लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीतून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट vssc.gov.in वर देण्यात आली आहे.