हिंदुस्थानने अंतराळात आणखी एक मोठी भरारी घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अंतराळातील महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत इस्रोने देशाचे पहिले स्पेस सेंटर तयार करण्यासाठी काम सुरू केले आहे. यासाठी टेक्नोलॉजी डेव्हलप करणे सुरू केले आहे. 2035 पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. अंतराळ स्टेशन पृथ्वीच्या खालील कक्षेत बसवले जाईल, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले. हिंदुस्थानी स्पेस सेंटरमध्ये दोन ते चार अंतराळ प्रवासी राहू शकतील. याआधी केवळ रशिया, अमेरिका आणि चीनने स्पेस सेंटर अंतराळात पाठवले आहेत.




























































