3 फूट उंचीचा आयरोनकब एमके3 रोबोट, छोट्या मुलासारखा चेहरा… 22 किलो वजन

इटलीच्या वैज्ञानिकांनी ह्यूमनाइड रोबोट बनवला असून हा रोबोट एकदम लहान मुलासारखा दिसतो. या रोबोटचे नाव आयरोनकब एमके3 असे आहे. हा बेबी रोबोट चार पॉवरफुल थ्रस्टरच्या मदतीने जवळपास 20 इंच वर उठतो. या रोबोटमध्ये दोन थ्रस्टर हात लावले आहेत. पाठीवर जेट पॅकप्रमाणे लावले आहेत. यामुळे या रोबोटला व्हर्टिकल टेक ऑफची पॉवर मिळते. या रोबोटचे वजन 22 किलो आहे. तसेच उंची 3 फूट इतकी आहे. या रोबोटकडे पाहिल्यानंतर ते एकदम छोट्या मुलासारखे दिसते.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हा रोबोट केवळ उडवण्यासाठी बनवण्यात आला नाही तर यामध्ये भविष्याच्या टेक्नोलॉजीची झलक दिसत आहे. हा रोबोट आपत्कालीन वेळी उपयोगी पडू शकतो. घरात किंवा कार्यालयात आग लागल्यानंतर आग विझवण्याचे काम हा रोबोट करू शकेल. या रोबोटमध्ये केवळ टेकऑफचा प्रयोग केला नाही तर मशीनची स्वतंत्र झलक दिसत आहे.

या रोबोटला मुलासारखे बनवले आहे. याची कॉम्पॅक्ट बॉडी खूपच खास आहे. हा रोबोट जमिनीवर चालतो. तसेच उड्डाणसुद्धा करू शकतो. पहिल्यांदा कोणत्या तरी छोट्या ह्युमनॉइड रोबोटने टेकऑफ केले आहे. म्हणजे न पळता थेट जमिनीवर हवेत उडणे होय. याआधीचे रोबोट स्थिर आहेत, परंतु रोबोटचे उड्डाण मर्यादित काळासाठी आहे.

हा रोबोट पूर्णपणे प्रोग्रामिंग किंवा रिमोट कंट्रोलने उडवला जाऊ शकतो. यात कोणतेही ऑटोनोमस एआय सिस्टम बसवण्यात आली नाही. वैज्ञानिक आता यात नेविगेशन, ऑब्सटेकल डिटेक्शन यासारखे आर्टिफिशियल इंटेलियन्स (एआय) पार्ट जोडण्याची योजना बनवत आहेत. या रोबोटचा वापर अनेक ठिकाणी करण्याची योजना इटलीच्या वैज्ञानिकांनी आखली आहे.