मुंबईतील पाळीव प्राण्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) पेट केअरविषयक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या काwशल्य विकास विभागाने घेतला आहे. मुंबईत पेट केअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्राणीप्रेमी आणि नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी गुगल फॉर्मची लिंक (https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfZsMPGIodkUXWu5Su2DRtFEVnyWb2SjFepoxkOqUcfdSe97g/viewform) नागरिकांनी लिंकवर जाऊन आपली मते, सूचना व हरकती नोंदण्याचे आवाहन केले आहे.































































