जबरा फॅन; कार्तिकला भेटण्यासाठी सायकलवरून 1100 किमीचा प्रवास

आवडत्या कलाकाराची एक झलक बघण्यासाठी चाहते धडपडत असतात. याचाच प्रत्यय नुकताच कार्तिक आर्यनच्या बाबतीत आला. कार्तिकच्या एका जबरा फॅनने त्याला भेटण्यासाठी 1100 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. दोघांच्या भेटीचा व्हिडियो व्हायरल होत आहे.

‘भूल भुलैया 2’ चा सुपरस्टार कार्तिकच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्याला भेटायला एक चाहता झांशी येथून नऊ दिवस सायकलने प्रवास करून मुंबईत आला. कार्तिकला याची माहिती मिळताच तो घराबाहेर आला आणि चाहत्याला भेटला. त्याची आपुलकीने विचारपूस केली.

‘पती, पत्नी और वो’, ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटांतून लोकप्रिय झालेला कार्तिक लवकरच ‘चंदू चॅम्पियन’ मध्ये दिसणार आहे. त्याचे दिग्दर्शन कबीर खान करत आहेत.