काटेरी फणसाची रसाळ माया..

हृदय स्वास्थ्यासाठी-
हृदय चांगले राखण्यासाठी तुम्ही फणसाचे सेवन करू शकता. वैज्ञानिक शोधानुसार फणसामध्ये असणाऱ्या विटामिन सी मुळे सूज कमी करण्यास मदत होते. फणसामध्ये आढळणाऱ्या पोटॅशियमचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही उपयोग होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका टाळला जातो. फणसामध्ये विटामिन बी होमोसिस्टीनचा स्तर कमी करणारे गुणधर्म आहेत. होमिसिस्टीनमुळे हृदयरोग वाढतो. तसंच फणसामधील लोहाचे प्रमाण हृदय मजूबत राखण्यास मदत करते.

पचनशक्ती चांगली राखण्यास मदत
फणस हा फायबरचा खूपच चांगला स्रोत आहे. ज्याचा चांगला परिणाम पचनसंस्थेवर होतो. फायबर आतड्यांमधील नलिका स्वच्छ करण्यास मदत करते. पचनक्रिया वाढविण्यास मदत होते. फायबरयुक्त पदार्थ हे पोटासंबंधी समस्या अर्थात बद्धकोष्ठ, डायरिया आणि गॅस व्यवस्थित करण्यास मदत करतात. त्यामुळे फणसाच्या हंगामात फणस खाणे अत्यंत चांगले ठरते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त –
आजकाल वजनवाढ ही खूपच मोठी समस्या झाली आहे. वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमध्ये तर हा त्रास बऱ्याचजणांना झालेला दिसून येत आहे. तसंच बदलती लाईफस्टाईलदेखील याला कारणीभूत ठरते आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात. मधुमेह, कॅन्सर, हृदयसंबंधित आजार यासाठी देखील वजनवाढ कारणीभूत ठरते. फणस हा विटामिन सी ने समृद्ध आहे. फणसाचे सेवन हे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते. फणस खाल्ल्याने पोट अधिक भरते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तसंच फणसामध्ये आढळणारे अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे वजन रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. फणसाचे फायदे म्हणजे यामध्ये रेसवेरेट्रॉल नावाचे अँटिऑक्सिडंट असून वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

हाडांसाठी चांगले –
हाडांच्या मजबूतीसाठी फणस हा एक उत्तम स्त्रोत आहे. फणसामध्ये कॅल्शियम आढळते, जे हाडांच्या मजबूतीसाठी आणि हाडांच्या विकासासाठी अत्यंत उत्तम तत्व आहे. शरीरामध्ये कॅल्शियमची आवश्यकता अधिक असते. चांगल्या हाडांसाठी तुम्ही आपल्या आहारात फणसाचा समावेश करून घ्यायला हवा. फणस हे हंगामी फळ असले तरीही तुम्ही संबंधित हंगामात फणसाचा फायदा करून घ्यायला हवा.

कॅन्सर-
कॅन्सरसारख्या घातक आजारापासून वाचण्यासाठी तुम्ही फणसाचे सेवन करणे चांगले आहे. फणस हा आयसोफ्लेवोन्स आणि सॅपानिन जसा फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असतो. जो कॅन्सरशी लढण्याचे काम करतो. तसंच फणसामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुण फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि कॅन्सर रोखण्यास मदत करतात. तसंच विटामिन सी चा चांगला स्रोत असल्यामुळे कॅन्सर थांबविण्यास याची मदत मिळते. एका शोधानुसार, कॅन्सरशी लढा देण्यासाठी फणसाचे फायदे अधिक आहेत. याशिवाय फणसामध्ये असणारे डाएटरी फायबर पोटाचा आणि इसोफेजियल कॅन्सर थांबविण्यास मदत करतात.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी-
शरीरातील प्रतिकारशक्ती कायम टिकून राहायला हवी असे प्रत्येकाला वाटते. फणसाची यासाठी मदत मिळते. तसंच विटामिन सी हे अँटिऑक्सिडंट स्वरूपात काम करते आणि शरीराला अन्य रोगांपासून वाचविण्यास मदत करते. प्रतिकारशक्ती व्यवस्थित राखण्याचे काम फणसामुळे अधिक चांगल्या प्रमाणात होते. सर्दी, खोकला अशा रोगांपासून दूर राखण्यास मदत करतात.

डोळ्यांसाठी –
फणसामध्ये विटामिन ए आणि सी दोन्ही तत्वे भरपूर प्रमाणात असातात आणि डोळ्यांसाठी ही दोन्ही पोषक तत्वे फायदेशीर ठरतात. विटामिन सी चे योग्य प्रमाण मिळत राहिले तर डोळ्यांसंबंधित आजार दूर पळतात. तसंच डोळ्यांच्या आजाराची जोखीम तुम्हाला नक्कीच स्वीकारावी लागत नाही. फणसाचे फायदे जेव्हा तुम्ही विचारात घेता तेव्हा डोळ्यांसाठीही याचा फायदा होताना दिसतो.

अनिमिया –
अनिमिया सारखा आजारदेखील फणसाच्या खाण्यामुळे जाऊ शकता. अनिमिया रक्तातील लाल पेशींच्या कमतरतेमुळे उद्भवतो. अनिमिया रोखण्यासाठी तुम्ही फणसाचे सेवन करू शकता. कारण यामध्ये जास्त प्रमाणात लोह असते जे लाल पेशी वाढण्यास आणि विकास करण्यास मदत करते. अनिमिया होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रक्तात लोहाचे प्रमाण कमी असणे. याशिवाय फणसामध्ये विटामिन बी6 चे प्रमाणही अधिक असते. हे पोषक तत्व लाल पेशींचा विकास करण्यास अधिक फायदेशीर ठरते.

रक्तदाबावर नियंत्रण –
फणसाचे फायदे शरीरातील रक्ताचा प्रवाह चांगला राखण्यासाठीही पाहिले गेले आहेत. फणसामध्ये असणारे पोटॅशियम आणि सोडियम हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी आणि योग्य रक्तदाब ठेवण्यासाठी मदत करते. पोटॅशियम हे उच्च रक्तदाब थांबविण्यासाठी आणि उपचारासाठी औषधात समाविष्ट करण्यात येते. विशेषतः त्या व्यक्तींनी फणसाचे सेवन करावे, ज्यांना सोडियम कमी सेवन करण्याची सवय आहे. तसंच फणसामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही अधिक असते जे उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत करते.

मधुमेह-
हा आजारा हल्ली अत्यंत सामान्य झाला आहे. मात्र ते योग्य नाही. तुम्हाला फणसाचे फायदे यासाठी होऊ शकतात. फणसामध्ये असणारे विटामिन बी हे मधुमेह रोग्यांचे इन्शुलिन सुधारण्यास मदत करते. एका शोधानुसार, कच्चा फणस हा प्रिडायबिटीसची लक्षणे घालविण्यास मदत करतो. मधुमेहासाठी फणसाचे औषधीय गुण असल्याचा उल्लेख भारतीय वैद्यकीय पद्धतीतही करण्यात आला आहे.

थायरॉईड-
ज्या व्यक्तीला थायरॉईड आहे त्यांनी फणसाचे सेवन नक्की करावे. फणसामध्ये कॉपरचे प्रमाण असते, जे थायरॉईड मेटाबॉलिज्म राखण्यास मदत करते. त्याशिवाय कॉपर थायरॉईडच्या आजारावरही फायदेशीर ठरते. एका शोधानुसार, हायपोथायरॉईज्मच्या रोग्यांसाठी विटामिन सी अत्यंत महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे. त्यामुळे थायरॉईड असल्यास फणस खाण्याचा उपयोग होतो.

त्वचेसाठी उपयोग –
त्वचेसाठी फणस अत्यंत उपयोगी ठरतो. फणसामध्ये विटामिन सी आहे, जे त्वचेला नुकसान पोहचवणाऱ्या मुक्त कणांशी लढण्यास अधिक फायदेशीर ठरते. तसंच फणसातील विटामिन बी हे त्वचेमधील पेशींचे पुनर्निर्माण करण्यास मदत करतात. विटामिन सी हे अँटीऑक्सिडंट गुण आणि कोलेजनची क्षमता असल्यामुळे त्वचेसाठी अधिक खास ठरते. तसंच सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचण्यासही याची मदत मिळते. याशिवाय फणस त्वचेला हायड्रेट करून कोरडेपणा कमी करण्याचे कामही करतो. यामध्ये फायबरचा चांगला स्रोत असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास याची मदत होते. त्यामुळे त्वचा चांगली राहाते.