
‘बिग बॉस ओटीटी 2’ मधील जाद हदीद आणि आकांशा पुरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात आकांशा पुरी आणि जाद हदीद यांनी एका टास्क दरम्यान लिपलॉक केले होते. त्यावरुन वादंग निर्माण झाला होता आणि दोघंही ट्रोल झाले होते. आता दोघंही या शोनंतर पुन्हा एकत्र दिसले. पॅपराजींसमोर रोमॅण्टिक होताना दिसले मात्र यावेळी जादच्या गर्लफ्रेण्डने आकांशाला त्याच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
जाद हदीद आणि आकांशा पुरी दोघंही पलक पुरसवानीच्या बर्थडे सेलब्रेशनमध्ये पोहोचले होते. या दरम्यान दोघंही रोमॅण्टिक होताना दिसले. पॅपराजींसमोर दोघंही पोज देत होते. त्याचवेळी जादने सर्वांसमोर आकांशाच्या गालावर किस केले. तर आकांशानेही त्याच्या गालावर किस केले. आता त्यांच्या या कृतीमुळे दोघंही ट्रोल झाले आहेत. युजर्सच्या म्हणण्यानुसार, जाद आणि आकांशा यांना लाज नाही. याचवेळी जादची गर्लफ्रेण्डही दिसली. तिने आकांशाला जादपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. पॅपराजींसमोर तिने हा इशारा आकांशाला दिला आहे. जैद त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत फिरताना दिसला. त्यावेळी पॅपराजींनी त्याला आकांशा कुठेय असे विचारले. त्यावेळी त्याच्या गर्लफ्रेण्डने हा इशारा दिला.
बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात दोन्ही कलाकारांना रोमॅण्टीक होताना दिसले आहे. दोघांनी एका टास्क दरम्यान एकमेकांसोबत लिपलॉक केले होते आणि त्यावरुन बराच वाद झाला होतो. मात्र त्यांच्यात नाते निर्माण होण्यापूर्वीच तुटले. किसींगवरुन ट्रोल झाल्यानंतर जादला सलमान खानने चांगले झापले होते. त्यानंतर जादने ती वाईट किसर असल्याचे बोलला तर आकांशाने त्यावेळी फक्त टास्कसाठी किस केले होते असे सांगितले. आता वाटतं दोघंही मागचे रुसवे फुगवे विसरुन मित्र बनले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दोघांमध्ये खास केमिस्ट्री दिसून येते.

































































