अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारची दहशतवादी संघटनेने ने घेतली जबाबदारी, पैसे पाठवण्याची केली मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली गाडी आढळली होती. ही गाडी जैश उल हिंद या संगठनेने ठेवल्याचे समोर आले आहे. या संघटनेने एक संदेश पाठवून ही जबाबदारी घेतली आहे. याच संघटनेने काही दिवसांपूर्वी दिल्लीतील इस्राईल दुतावासाबाहेर स्फोट केला होता. तसेच या संघटनेने बिटकॉईनच्या माध्यमातून पैश्यांची मागणी केली होती.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ गुरुवारी पहाटे स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार पार्क करून चालकाने शिताफीने पळ काढला. बेवारस उभ्या असलेल्या या गाडीची माहिती मिळताच सर्वच तपास यंत्रणांनी त्या ठिकाणी धाव घेतली. गाडीत जिलेटिनच्या कांड्या, धमकीचे पत्र आणि अनेक नंबर प्लेट सापडल्यामुळे आणखीनच खळबळ उडाली.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. स्कॉर्पिओ कार ठाण्यातील एका व्यापाऱयाची असून ती विक्रोळी येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.  याप्रकरणी जैश ए हिंद या दशतवादी संघटनेने ही जवाबदारी स्विकारली आहे. टेलिग्रामवरून या संघटनेने एक संदेश जारी केला आहे. या संदेशात या संघटनेने आव्हान दिले आहे. या संदेशात म्हटले आहे की, “रोक सको तो रोकलो, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्या नाकाखाली आम्ही दिल्लीत हल्ला केला. तुम्ही मोसादची मदत घेऊनही तुमच्या हाती काही लागले नाही. आम्हाला पकडण्यात तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. फक्त पैसे पाठवून द्या असेही या संदेशात म्हटले आहे.