जालना जिल्ह्यात 75 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज जालना जिल्ह्यात ७५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून उपचारादरम्यान २ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद असून जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ७०४ इतकी झाली असून यापैकी यशस्वी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ८५० इतकी आहे.

कोव्हीड हॉस्पीटल, देऊळगाव उगले ता. जाफ्राबाद जि. जालना येथील ७० वर्षीय पुरुष व दीपक हॉस्पीटल, जालना येथे शास्त्री नगर शेवगाव जि. नगर येथील ५५ वर्षीय पुरुष अशा एकुण दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. जालना तालुक्यातील चंदनझिरा -१, वंजार उम्रद -२, मंठा चौफुली -१,लक्ष्मीकांत नगर -१, बन्सीपुरा -१, शिवनगर -१, मोदीखाना -१, नंदनवन कॉलनी -३, सामान्य रुग्णालय निवासस्थान -१, पोलास गल्ली -१, योगेश नगर -१, भाग्योदय नगर -१, समर्थ नगर -१,इन्कम टॅक्स कॉलनी -१, सिध्दी विनायक नगर -१,ढवळेश्वर -१, अंबड चौफुली -१, माऊली नगर -१, जालना शहर -१ मंठा तालुक्यातील जांब-१, तळणी -५, परतुर तालुक्यातील आष्टी-४, घनसावंगी तालुक्यातील – राजुर कोठा -६, कुंभार पिंपळगाव -१, मुर्ती -२, अंबड तालुक्यातील अंबड शहर -३, महावरी चौक -१, बानेगाव -२, बदनापुर तालुक्यातील हिवरा दाभाडी -१, केळीगव्हाण -१ ,जाफराबाद तालुक्यातील – खानापुर -२, डोंगरगाव -१, देळेगव्हाण -१, भोकरदन तालुक्यातील- भोकरदन शहर -२, नांजा वाडी -१, केदारखेडा -१, सराफ गल्ली -१, इतर जिल्हे वडगाव तेजन ता. लोणार -१, देऊळगावराजा -१, लोणार -१, सिंदखेडराजा -१, किनगाव राजा -१, फुलंब्री जि. संभाजीनगर -१ अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दारे ६४ व्यक्तींचा व अँटीजेन तपासणीद्वारे ११ व्यक्तींचा अशा एकुण ७५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली