पाच हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तक्रारदार यांच्या विरोधातील गुन्ह्यात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदाराला तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेताना जालना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. उदलसिंग मानसिंग जारवाल असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. ही कारवाई 18 ऑक्टोंबर रोजी तालुका जालना पोलीस ठाण्यात करण्यात आली. यातील तक्रारदार यांच्या विरुद्धातील गुन्ह्याचा पोलीस हवालदार उदलसिंग जारवाल हे सदर तपास करीत असून, त्यांनी तक्रारदारास तुमचे गुन्ह्याचा तपास लवकर पुर्ण करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करतो, असे म्हणून तक्रारदाराकडून 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, जालना येथे तक्रार केली.

या तक्रारीवरुन 18 ऑक्टोबर रोजी लाच मागणीबाबत पडताळणी केली. त्यावरुन बुधवारी एसीबीने सापळा रचत पोलीस हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले. तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक किरण बिडवे यांच्यासह पथकातील गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, गजानन खरात, संदीपान लहाने, जावेद शेख, विठ्ठल कापसे, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, शिवलिंग खुळे यांनी केली आहे.