जालन्यातील धोपटेश्वरात पाण्याच्या टाकीवर, बाजी उम्रद येथे हाय व्होल्टेज उच्च दाबाच्या टॉवरवर आंदोलकांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. आंदोलनक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथे मराठा बांधवांनी पाण्याच्या टाकीवर चढून तर जालना तालुक्यातील बाजी उम्रद येथे मोबाईल टावरवर चढून मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून मराठा बांधव आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरंगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे विना अन्न पाण्याचे आंदोलन सुरू असल्याने त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे तसेच सरकार कुठलेही ठोस पाऊल उचलत नसल्याने मराठा बांधवात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा व मराठा आरक्षण जाहीर करावा अशी मागणी आहे. आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण,अबलवृद्ध, महिला प्रचंड प्रमाणात सहभागी होत आहे. मराठा समाज विविध पद्धतीने जिल्हाभरात आंदोलन करीत असून कुठे गाव बंदी तर कुठे वेगळ्या पद्धतीची आंदोलन सुरू आहे. मात्र इतके असूनही सरकारमूग गिळून गप्प बसले आहे. या आंदोलनात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी कोणी पाण्याच्या टाक्यावर चढून तर कोणी झाडावर तर कोणी मोबाईल टावरवर तर कोणी विद्युत महावितरणच्या टावरवर चढून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे सरकारने आता तरी जागे व्हावे अशी मागणी मराठा समाज बांधवातून होत आहे.

धोपटेश्वर येथे मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन सुरू असून एक मराठा कोटी मराठा घोषणा दिल्या जात आहे. यात संतोष दाभाडे, नारायण दाभाडे, अमोल दाभाडे, अरुण दाभाडे, सहदेव कोल्हे, हरिभाऊ तिडके, अर्जुन शेळके, अजय कोल्हे, आकाश शेळके, उमेश दसपुते, मनिष शेळके, नानासाहेब दाभाडे, पवन शेरे, रोहीत कोल्हे, योगेश दाभाडे आदींसह मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी सहभागी झाले आहेत.

बाजी उम्रद शिवारात मराठा तरूण हाय व्होल्टेज उच्च दाबाच्या टाॕवरवर चढले

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या बाजी उम्रद परिसरामध्ये मराठा तरुण हाय व्होल्टेज उच्च दाबाच्या टाॕवरवर चढले असून जोपर्यंत जालना तहसीलदार मंडळ अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे आंदोलकांची मागणी आहे. सध्या मोजपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नांगरे यांनी घटनास्थळी दाखल झालं असून त्यांच्या विनवणी करूनही आंदोलक खाली उतरण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत.