जळगावमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या

30

सामना प्रतिनिधी। जळगाव

मेहरुणमधील रामनगर येथे किर्ती पवन दुसाने (17 ) या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किर्ती ही मेहरुणमधील श्रीराम कन्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी ती शाळेत गेली नव्हती. वडील पवन दुसाने व आई भारती दोन्ही जण कामावर गेलेले होते. त्यामुळे किर्ती व लहान भाऊ लोकेश असे दोघेच घरी होते. दोघांनी दीड वाजता सोबत जेवण केले. त्यानंतर लोकेश बाहेर खेळायला निघून गेला. दुपारी अडीच वाजता तो घरी आला असता दरवाजाची कडी आतून बंद होती.यामुळे त्याने खिडकीतून डोकावून पाहीले असता किर्तीचा गळफास लावून घेतलेला मृतदेह त्याला दिसला.

आपली प्रतिक्रिया द्या