जालना जिल्ह्यातील धामणापाठोपाठ पद्मावती धरणही ओव्हरफ्लो

628

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरात रात्री झालेल्या जोरदार पावसाने धामणापाठोपाठ पद्मावती धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील 15 ते 20 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच परिसरात होत असलेल्या पावसाने पारधच्या रायघोळ नदीला पूर आला आहे.

भोकरदन तालुक्यातील पारधजवळच आसलेल्या शेलूद येथील धामणा धरण 15 दिवसांपूर्वीच 100 टक्के भरल्याने बळीराजा सुखावला आहे. धामणापाठोपाठ आता पद्मावती धरणही पूर्ण भरले आहे. सोमवारी सायंकाळी आणि रात्री पारधसह परिसरातील धावडा, वडोद तांगडा, वालसावंगी आदी भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पारधजवळच असलेले पद्मावती धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पद्मावती धरणामुळे पारधसह मराठवाडा व विदर्भातील 15 ते 20 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच परिसरात सुरू असलेल्या पावसाने पारध येथील रायघोळ नदीला पूर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या