
जालना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घरगुती सेक्स रॅकेट चालवणार्या एका कुटुंबावर जालन्यात पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्या पथकाने छापा मारून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नूतन वसाहत परिसरातील रेवगाव रोडवर ही कारवाई करण्यात आली.
जालना शहरातील कांचन नगर, शिवनगर तसेच नूतन वसाहत भागात एका घरात वेश्याव्यवसाय करणार्या संतोष उढाणला अखेर पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्या पथकाने आज बेड्या ठोकल्या आहेत. रेवगाव रोडवरील एका घरात छापा मारून एक ग्राहक, दोन कॉल गर्ल, सेक्स रॅकेट चालवणारी व्यक्ती, त्याची पत्नी आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक दिवसापासून संतोष उढाण हा जालना शहरात सेक्स रॅकेट चालवत असल्याची तक्रार कांचन नगर येथील नागरिकांनी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे केली होती.
त्यानंतर त्याने आपले स्थान बदलले होते. आज अखेर पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांच्या पथकाने कारवाई करून हा सेक्स रॅकेटचा गोरख धंदा उघड केला
आहे. सध्या पोलिसांनी मुंबई येथून आलेल्या दोन कॉल गर्ल, संतोष उढाण, एक ग्राहक, त्याची पत्नी आणि एका वृद्ध महिलेस ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू, सहायक पोलीस निरीक्षक निशा बनसोड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस कर्मचारी दादासाहेब चव्हाण यांच्यासह पथकाने केली.