जम्मू-कश्मीर- बारामुल्लात दहशतवादी कटाचा पर्दाफाश, मोठा शस्त्रसाठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमधी बारामुल्ला येथे मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हिंदुस्थानी सैन्याने ही हत्यारे जप्त करून दहशतवादी कट उधळून लावला आहे. हे ठिकाण खूप आधीपासून वापरात असावं असा अंदाज सैन्याने वर्तवला आहे.

बारामुल्ला येथील कारवाईत सैन्याला एके-47च्या दोन बंदुका, दोन हजार बुलेट्स, वायरलेस सेट सापडलं आहे. तसंच काही कपडेही सापडले आहेत. त्यामुळे आधीपासूनच ही जागा दहशतवाद्यांच्या वापरात असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळपास दहा वर्षांपासून या जागेचा वापर दहशतवादी करत असावेत, असंही बोललं जात आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.