जम्मू कश्मीरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

574

जम्मू कश्मीरमध्ये सलग तिसऱ्य़ा दिवशी दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली या चकमकीत आतापर्यंत चार दहशतवादी ठार झाले आहे. मंगळवारी त्रालमध्ये उडालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला.

मंगळवारी अवंतीपुरा जिल्ह्यातील सैमोह गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांत चकमक उडाली. त्यात एक दहशतवादी ठार झाला. मृत दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.


सोमवारी तीन दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी करत होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे होती. तेव्हा कलल गावाजवळ सुरक्षादलांनी त्यांना कंठस्नान घातले.

आपली प्रतिक्रिया द्या