जम्मू कश्मीरमध्ये पोलिसांच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला, दहशतवाद्यांचा शोध सुरू

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण वाढत आहेत. आता जम्मू कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी किश्तवाडच्या छातरू भागात पोलीस पेट्रोलिंग करत होते. तेव्हा काही दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड फेकला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. हल्ल्यानंतर पोलिसांनी तत्काळ या भागात शोध मोहीम हाती घेतली. यासाठी पोलिसांनी सीआरपीएफ जवानांनाही पाचारण केले.

आपली प्रतिक्रिया द्या