
उधमपूर जिह्यातील जंगल आणि डोंगराळ भागात आश्रय घेऊन दहशतवादी हल्ले करणाऱया अतिरेक्यांबरोबर आज पुन्हा सुरक्षा दलांची चकमक उडाली. बसंतगढच्या जंगलात वरच्या भागात झालेल्या या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांना टिपण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली.
दोन्ही दहशतवादी पाकिस्तानचेच आहेत
लष्कराच्या फर्स्ट पॅरा सैनिकांच्या तुकडीला बुधवारी सकाळी उधमपूरच्या खंडारा टॉपच्या जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात आली. हा दाट जंगलभाग लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पथके पिंजून काढत असताना दुपारी 12.50 वाजता दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार सुरू केल्यावर चकमकीला तोंड फुटले. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी मारले गेले. सुमारे चार तास ही चकमक सुरू होती.
18 सप्टेंबर रोजी राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याच्या सात दिवस अगोदर ही चकमक घडल्यामुळे सुरक्षा दले अधिक सतर्क झाली आहेत.
पेंद्राचा निर्लज्ज दावा
गेले काही महिने उधमपूर, कटरासह जम्मूच्या अनेक भागांत दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. अनेक लष्करी अधिकारी, सैनिक शहीद झाले आहेत. तरीही, पेंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू कश्मीरमधील दहशतवाद आणि विघटनवादाचा कणा मोडल्याचा निर्लज्ज दावा भाजपने केला आहे. दहशतवादाबाबत पेंद्राच्या शून्य सहिष्णुता धोरणामुळे खोऱयात प्रस्थापित झालेली शांतता कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे अधिक बळकट झाली. दहशतवादाच्या घटनांमध्ये 70 टक्के घट झाली आहे, असे जम्मू-कश्मीर भाजपचे प्रवत्ते, ले. जनरल राकेश शर्मा (निवृत्त) यांनी म्हटले आहे.
























































