जम्मू कश्मीरच्या राजौरीमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन दिसले, राज्यात हाय अलर्ट

जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक भागात ड्रोन दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. राजौरी शहरातल्या डुंगाला नाबला, थंडी खस्सी या भागात हे ड्रोन्स दिसले आहेत. जवानांनी या ड्रोन्सवर तत्काळ गोळीबार करत ते पाडले आहेत. या घटनेनंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला शस्त्रसंधी उल्लंघनानंतर इशारा दिल्यानंतर हे ड्रोन दिसून आले आहेत.

मंगळवारी कठुआ जिल्ह्यातल बिलावर पट्टयात दशतवाद्यांविरोधात शोध मोहिम राबवण्यात आलेली. या वेळी तब्बल पंधरा मिनिटं जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दरम्यान अद्याप कोणत्याही दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली नसून बुधवारी ही शोधमोहिम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.