निवडणूक जिंकणाऱ्यांना नजरकैदेत ठेवले जातेय; ओमर अब्दुलांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत गुपकार आघाडीने बाजी मारली. मात्र या निकालानंतर आता फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण आले असून जम्मू-कश्मीर येथील नॅशनल काॅन्फरन्सच्या विजयी उमेदवारांना नजरकैदेत ठेवले जात असल्याचा आरोप पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी केला. तर या उमेदवारांना पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याची टीका करताना त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीचा विजय असल्याचे मत मांडले तर दुसरीकडे निवडणूक लढविणाऱयांना धमकाविले जात आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. शोपिया येथे आमच्या पक्षाच्या महिला उमेदवाराने विजय प्राप्त केला होता. त्यांना पक्षांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असून यासंदर्भातील रेकाॅर्डिंग आमच्याकडे असल्याचा दावादेखील ओमर अब्दुला यांनी यावेळी केला.