15,000 बालकांची ‘जननी’ नरसम्मा यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकातील मागास भागात ‘जननी अम्मा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुलागिट्टी नरसम्मा (98) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय नरसम्मा यांनी मागास भागातील 15 हजारांहून अधिक महिलांची सुरक्षित प्रसूती केली होती. त्यामुळे त्यांना ‘जननी अम्मा’ म्हणून ओळखले जात होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि समाजिक सेवेबद्दल त्यांना ‘पद्मश्री’सह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. कर्नाटक सरकारनेही नरसम्मा यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविले होते. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.