
सामना प्रतिनिधी। मालवण
दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत दैदीप्यमान यश मिळवलेल्या जान्हवी लाड या विद्यार्थीनीचा शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जानव्हीच्या कट्टा येथील निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला. यावेळी जानव्हीचे आईवडील व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दहावीत यश मिळवलेल्या अन्य विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, जिप सदस्य हरी खोबरेकर, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, दीपा शिंदे, व अन्य यावेळी उपस्थित होते.































































