
कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनताकर्फ्यूला सांगली शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रस्ते ओस पडले असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
रविवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत शहरातील संपूर्ण रस्ते निर्मनुष्य होते. रस्त्यावरून एकही वाहन धावताना दिसत नव्हते. जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. सांगलीकर जनतेने कोरोनाला राष्ट्रीय संकट मानून जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद दिला. घरातून बाहेर न पडता जनतेने कोरोनाशी लढाई सुरू केली आहे.


























































