
जपानच्या आओमोरी प्रांतात सोमवारी रात्री 7.5 तीव्रतेचा भूकंप झाल्याने संपूर्ण जपान हादरले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भूकंपानंतर समुद्र देखील खवळला असून त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे सर्वांमध्येच भितीचे वातावरण पसरले आहे.
जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा सोमवारी रात्री भूकंप झाला. आओमारी प्रांत हे भूकंपाचे केंद्र असून 50किमी भूगर्भात हा भूकंप झाला आहे. त्यामुळे जपानच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या हादऱ्याने रस्ते उद्ध्वस्त झाले असून इमारतींचे नुकसान झाले आहे, या भूकंपात 33 लोकं जखमी झाली आहेत. ज्यापैकी एकाची अवस्था गंभीर आहे.
सोमवारी रात्री 11.15 वाजता जपानच्या होन्शु आयलॅण्डच्या अगदी जवळ भूकंप झाला आणि जपानच्या बहुतेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप इतका तीव्र होता की त्यामुळे समुद्रात लाटा उसळल्या आणि जपान आणि पॅसिफिक महासागराच्या आसपासच्या इतर देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला.



























































