खासदारांच्या चुकीसाठी जपानच्या पंतप्रधानांनी मागितली माफी

पक्षातील काही खासदार नाईट क्लबमध्ये गेल्याने जपानच्या पंतप्रधान योशिहिदे यांना देशाची माफी मागितली आहे. एकीकडे कोरोनाचे सावट असताना आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन सुगा सरकारच्या वतीने करण्यात आले होते.

मात्र हे आवाहन झुगारून लावत योशिहिदे यांच्या पक्षातील काही खासदार थेट नाईट क्लबमध्ये गेल्याचे वृत्त समोर आले. या वृत्तानंतर पक्षावर प्रचंड टीका करण्यात आली असून त्यानंतर सुगा यांना माफी मागण्याची वेळ आली आहे. ‘लोकांनी रात्री आठनंतर घारबाहेर पडू नये, बाहेरच्या गोष्टी खाणं टाळावं आणि गरज नसेल तर उगाच बाहेर फिरु नये असं आम्ही लोकांना सांगत असतानाच आमच्या खासदारांनीच याचं उल्लंघन केल्याबद्दल मी खूप निराश आणि दुःखी झालो आहे.

जनतेचा आपल्यावरील विश्वास वाढेल अशा पद्धतीचं आचरण प्रत्येक खासदाराचं असावं,’ अशा शब्दांमध्ये सुगा यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या