
सामना ऑनलाईन । मुंबई
भजन गायक अनुप जलोटा यांनी बिग बॉसच्या सेटवर त्यांची अर्ध्या वयाची हॉट गर्लफ्रेंड जसलीन मथारू हिची ओळख करून दिली आणि सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला. जसलीनच्या कुटुंबीयांसाठी देखील हे सर्व धक्कादायक होते. जसलीनच्या वडीलांनी तर प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांना हे नातं मान्य नसल्याचे जाहीर केले होते. मात्र आता एका टास्कनंतर अनुपजींनी जसलीनसोबत ब्रेकअप केल्यानं जसलीनचे वडील प्रचंड खूश झाले आहेत.
या आठवड्यात स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी बिग बॉसने स्पर्धकांना अपहरणाचा टास्क दिला होता. त्यात सिंगल स्पर्धकांना जोडीतील एका स्पर्धकाचे अपहरण करायचे होते. त्यानंतर जोडीतील दुसऱ्या स्पर्धकाकडून काहीतरी बलिदान मागायचे होते. या टास्कमध्ये दीपिका कक्कर इब्राहिमने अनुपजींचे अपहरण केले होते आणि जसलीनला तिचे सर्व कपडे, तिचा मेकअप उद्ध्वस्त करायला सांगितला होता. तसेच तिचे केस खांद्यापर्यंत कापायला सांगितले होते. जर जसलीनने तिचे सर्व कपडे व मेकअप किट दिले असते तर या आठवड्याच्या नॉमिनेशनपासून जसलीन आणि अनुपजी सुरक्षित झाले असते. मात्र जसलीनने तसे करण्यास नकार दिला. याचा अनुपजींना राग आला व त्यांनी जसलीनसोबत ब्रेकअप केले.
घरात झालेल्या या हाय व्होल्टेज ड्रामाचे पडसाद बाहेरही उमटले. ब्रेकअपमुळे जसलीन आणि अनुपजी जरी दुखी असले तरी जसलीनचे कुटुंबीय मात्र खूश झाले आहेत. जसलीनच्या वडीलांच्या आनंदाला तर पारावार उरलेला नाही. ‘सध्या मी खूप खूश आहे. माझ्या मुलीचे अनुपजींसोबत प्रेमसंबंध आहेत हे ऐकून मला धक्का बसला होता. मी विचारच करत होतो की तिची समजूत कशी काढायची. ती जे करतेय ते चुकीचे आहे हे तिला कसे पटवून द्यायचे. मात्र आता मला असे काहीही करावे लागणार नाही. अनुपजींना जसलीनसोबत ब्रेकअप करून योग्य निर्णय घेतला आहे. यामुळे दोघांनाही फायदा होईल. हे नाते फार काळ टिकणारे नव्हते’, असे जसलीनचे वडील केसर मथारू यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.































































