सातेरीची जत्रा

171

तळकोकणात ठिकठिकाणी आदिमाया, आदिशक्ती पार्वती भक्तांच्या रक्षणासाठी सातेरी देवी आणि अन्य देवींच्या रूपात प्रगटलेली आहे. बहुतांश गावांत सोतेरी ही कुलदेवता आहे. या कुलदेवतेचे सदैव स्मरण राहावे म्हणून भक्तगण वर्षानुवर्षे उत्सव आणि धार्मिक विधी परंपरेने पार पाडत आले आहेत.

मालवण तालुक्यात पेंडूर येथे श्री देवी सातेरीचा मांड एक वर्षआड भरतो. हा मांड सातेरी मंदिर व श्री देव वेताळ मंदिरातही एकाच वेळी भरतो आणि एकाच वेळी उठतो. वेताळ ही पेंडूरची ग्रामदेवता तर सातेरी ही कुलदेवता आहे. हा मांड चौदा दिवस असतो. आता येणारा मांड हा 15 ते 28 जानेवारी 2019 या कालावधीत भरत आहे. या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठय़ा प्रमाणात येतात. या कालावधीत दोन्ही मंदिरांत दिवसरात्र धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. एक दिवसआड दोन्ही देवळांतून पालखीची मिरवणूक निघते. हा कार्यक्रम डोळय़ांचे पारणे फेडणारा असतो. या मंदिरांकडे जाणारा प्रत्येक रस्ता गर्दीने तुडुंब भरलेला असतो. मांडाच्या काळात संपूर्ण गावाला जणू यात्रेचेच स्वरूप आलेले असते.

आपली प्रतिक्रिया द्या