Video : मियाँदादचे डोकं फिरलया, म्हणे हिंदुस्थानला संपवून टाकू!

961

कश्मीरातून 370 कलम हटवल्यामुळे एकूणच पाकडय़ांचा तिळपापड झाला आहे. त्यात केवळ त्यांचे राजकीय नेतेच नव्हे तर क्रिकेटपटूही बिथरले आहेत. ‘हिंदुस्थानचे लोक भित्रे आहेत. पाकिस्तानने अण्वस्त्र केवळ दाखवायला ठेवलेली नाहीत, संधी मिळताच ती वापरून हिंदुस्थानला संपवून टाकू’, अशी फुसकी धमकी जावेद मियाँदाद याने दिली आहे.

पाकिस्तानमधील खेळाशी संबंधित असलेल्या एका वेबसाईटच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जावेद मियांदाद याने आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात हा माजी क्रिकेटपटू पत्रकारांशी कश्मीर मुद्यावर चर्चा करतोय.

आपली प्रतिक्रिया द्या