जव्हारमध्ये मातीचा ढिगारा कोसळुन दोन आदिवासींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघरमधील जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावातील आदिवासी शेतकरी घरांसाठी माती खोदत असताना वरून मातीचा धस (ढिगारा) कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे. मृतांमध्ये एक अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य दोन जणांना गंभीर दुखापत झाली असून चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

पावसाळा जवळ आल्यामुळे घरांच्या कुडांना सारवण्यासाठी मनोज जाधव हे कुटूंबातील महिलांना घेऊन गावाशेजारील डोंगरावर माती खोदण्यासाठी गेले होते. खोदकाम करत असताना अचानक वरून मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने मनोज जाधव आणि मुक्ता तराळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य गंभीर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.