
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रदर्शित होईल. ‘पठान’चा विक्रम मोडण्यासाठी ‘जवान’ सज्ज असून या चित्रपटाचे एडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर ‘गदर-2’ या चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटाने 419 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर शाहरूखच्या ‘पठान’ चित्रपटाने 524 कोटी कमावले होते. त्यामुळे ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकतो का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
‘जवान’ हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होईल. विदेशामध्ये या चित्रपटाची एडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे, मात्र हिंदुस्थानी प्रेक्षकांना यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. या चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपतीही यात दिसतील. याशिवाय प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.































































