सौरभ गांगुली, जय शहाचा फैसला आता जानेवारीत; सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शहा आता जानेवारी महिन्यापर्यंत आपल्या पदावर कायम राहणार आहेत. बीसीसीआयची घटना दुरुस्ती संबंधित याचिका आता जानेवारी महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या 24 डिसेंबरला होणाऱया वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सौरभ गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवतील. त्याचसोबत जय शहा व सहसचिव जयेश जॉर्जही या बैठकीत सहभागी होतील.

सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीने कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी व भ्रष्टाचारापासून दूर राहण्यासाठी बीसीसीआयसाठी नवी घटना तयार केली. या नव्या घटनेनुसार एखाद्या व्यक्तीने राज्य संघटना तसेच बीसीसीआयमध्ये सलग सहा वर्षे पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना ती वर्षांची विश्रांती घेणे अनिवार्य आहे. या नियमानुसार सौरभ गांगुली, जय शहा व जयेश जॉर्ज यांचा कार्यकाळ काही महिन्यांपूर्वीच संपुष्टात आला आहे.