जयदत्त क्षीरसागर गुरुवारी अर्ज दाखल करणार

बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हे गुरुवारी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बीड विधानसभेसाठी शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदार संघातील शिवसैनिक भाजपा कार्यकर्ते बीड मध्ये दाखल होणार आहेत. या निमित्ताने शिवसेनेचा भगवा झंझावात बीडमध्ये पाहण्यास मिळणार आहे. यावेळी शिवसेनेचे आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बीडकडे लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या