
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. ”या देशाला अत्यंत खंबीर असं नेतृत्व मिळालं आहे आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे”, अशा शब्दांत जयाप्रदा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Delhi: Veteran actor and former MP Jaya Prada joins Bharatiya Janata Party. pic.twitter.com/vmZD3H1PSL
— ANI (@ANI) March 26, 2019
विविध भाषांमध्ये जवळपास 300हून अधिक चित्रपट करणाऱ्या जयाप्रदा यांनी 1994 मध्ये तेलगु देशम पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चंद्रबाबू नायडूंना साथ देत त्यांच्या गटात सामील झाल्या. 1996मध्ये त्यांना आंध्र प्रदेशमधून राज्यसभेत पाठवण्यात आले. त्यानंतर चंद्राबाबूंशी मतभेद झाल्याने त्यांनी तेलगू देसमला रामराम करत समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 2004च्या निवडणुकांमध्ये त्यांनी रामपूर प्रभागातून निवडणूक लढवली आणि निवडून आल्या. 2004 ते 2009पर्यंत त्या खासदार म्हणून कार्यरत होत्या.


























































