युतीचा प्रतिस्पर्धी पक्ष शोधण्याची वेळ आली आहे – जयदत्त क्षीरसागर

2682
jaydutt-kshirsagar

 येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचा प्रतिस्पर्धी पक्ष कोणता हे शोधण्याची वेळ आली असून राष्ट्रवादी काँग्रेस चे जे नेते आपल्यावर टीका करत होते ते त्यांचे उसने अवसान असल्याची टीका राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून केली. जयदत्त क्षीरसागर यांनी आज पाथर्डी येथील आपले मेहुणे वसंत भांडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जी.प. सदस्य राहुल राजळे,नगरसेवक अनिल बोरुडे माजी नगरसेविका लतिका भांडकर यांच्या   सह विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले कि, सध्याचे युती शासन जे बोलते ते करून दाखवते असा जनतेचा विश्वास असल्याने येणाऱ्या विधानसभेला पुन्हा एकदा युतीचे सरकार बहुमताने सत्तेवर येणार आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने चार खोऱ्याचे पाणी आडवून ते पाणी मराठवाड्यात सोडण्याच्या सकारात्मक निर्णय घेतला आहे. श्वास कोंडला तर माणूस मोकळ्या हवेत फिरायला जातो. आपलाही श्वास राष्ट्रवादीत कोंडत असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्याला मंत्रीपद देऊन सन्मान केला आहे. मंत्रीपद हे मला नवीन नसून पाचव्यांदा मंत्रीपद मिळालेले आहे.  लोकसभा निवडणुकीतच मी भाजप उमेदवाराचे काम करून पाऊलवाट तयार केली त्याचा आता राष्ट्रीय महामार्ग तयार झाल्याने बीड जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजप सेना युतीचे उमेदवार निवडून येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फक्त बीड जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले याचे कारण म्हणजे कदाचित आपलीच माणसे पक्षात राहतील की नाही याची खात्री राहिली नसल्याने त्यांनी ही घोषणा केली असावी असे वाटते. एखाद्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी घोषणा अगोदर करतील असे वाटत नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या