कोरोनाची भीती, जेईई-ऍडव्हान्स्ड परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्या घसरली

कोरोना संकटाचा प्रभाव जेईई-ऍडव्हान्स्ड या परीक्षेकर जाणवत आहे. जेईई-मेन परीक्षेचा निकाल अलिकडेच जाहीर झाला. त्यातील अडीच लाख विद्यार्थी हे जेईई-ऍडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. परंतु अडीच लाखांपैकी फक्त 1 लाख 60 हजार 864 विद्यार्थ्यांनीच जेईई-ऍडव्हान्स्डसाठी अर्ज भरला आहे. गेल्या तीन कर्षात जेईई-ऍडव्हान्सडला बसलेल्या विद्यार्थ्यांची ही सर्वात कमी संख्या आहे.

जेईई-मेन परीक्षेत 2000 च्या आतील रँक मिळवणाऱया विद्यार्थ्यांना एनआयटीमध्ये त्यांच्या आवडत्या अभ्यासक्रमांना सहज प्रवेश मिळत आहे. जेईई-ऍडव्हान्स्डमध्ये रँक मिळवूनही आपल्या आवडत्या आयआयटी संस्थेत आवडत्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवताना बरीच धडपड करावी लागते असे आयआयटीचे प्राध्यापक सांगतात.

जेईई-ऍडव्हान्स्ड परीक्षा येत्या 27 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा उपाययोजना करून व आवश्यक ती काळजी घेऊन ही परीक्षा घेण्याची तयारी आयआयटी दिल्लीने पूर्ण केली आहे.  त्यासाठी जेईई-मेन परीक्षेआधीच एक पोर्टलही लॉन्च केले आहे.

प्रवेशासाठी एनआयटी संस्थांना प्राधान्य

जेईई-ऍडव्हान्स्ड परीक्षा यंदा आयआयटी, दिल्ली घेणार आहे. आयआयटी, दिल्लीकडूनच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट गंभीर बनल्याने विद्यार्थ्यांनी जेईई-ऍडव्हान्स्डला न बसण्याचा निर्णय घेतला असावा असे सांगण्यात येते. अगदी जेईई-मेन परीक्षेचा अर्ज भरूनही सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नव्हती. जेईई-मेनच्या गुणांच्या आधारावरच बहुतांश विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत. याच कारणास्तक यावर्षी एनआयटीमध्ये प्रवेश वाढले आहेत असे तज्ञांचे म्हणणे आहे.

र्ष   जेईई-ऍडव्हान्स्डला बसलेले विद्यार्थी

2020          1,60,864

2019          1,73,000

2018          1,65,000

आपली प्रतिक्रिया द्या