धाराशिव – गोपीचंद पडळकर व मल्हार आर्मी यांच्यातील वाद चिघळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
malhar-army

जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन उद्या होळकर घराण्याचे वंशज यशवंतराजे होळकर यांच्या हस्ते करण्यात येणार होते. या कार्यकम पत्रिकेत पडळकर यांचे नाव नव्हते.

यामुळे गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळीच गुपचुप पुतळ्याचे अनधिकृतपणे उद्घाटन केल्याच्या प्रकरणावरून वाद पेटला आहे. मल्हार आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आक्रमक होत त्यांचा निषेध केला.

पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत केला निषेध

पडळकर यांनी उद्घाटन करून यशवंत राजे व धनगर समाजाचा अपमान केला, असा आरोप करण्यात करण्यात येत आहे. पडळकर यांना मल्हार आर्मी सुरेश कांबळे यांच्याकडून इशाराही देण्यात आला आहे.