ट्रम्प दौर्‍यापूवी जैश ने जारी केला व्हिडीओ, बदल्याची केली भाषा

1181

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोलाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थानच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये बदला घेतला जाई असे म्हटले आहे. ही धमकी हिंदुस्थानला दिली आहे असे म्हटले जाते

जैश ए मोहम्मदने जारी केलेल्या व्हिडीओअमध्ये म्हटले आहे आहे की, ज्या प्रमाणे मुस्लिमांना त्रास दिला गेला, त्यांची घरे जाळली गेली. त्या सगळ्यांचा बदला घेतला जाईल. तसेच व्हिडीओमध्ये कुराण शरीफमधील वाक्यांचा संदर्भ दिला गेला आहे. आता मारेकर्‍यांचे दिवस भरले आहेत. शांततेचा बाष्कळ चर्च आम्ही खूप ऐकल्या. शांत बसून राहण्याचे दिवस गेले असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार ही हिंदुस्थानला दिलेली धमकी आहे.

कलम 370 हटवल्याने कश्मीरमध्ये जनता नाराज आहे हे पाकिस्तानला ट्रम्प यांना दाखवायचे आहे. तसेच कश्मीरमध्ये असंतोष असून दहशतवादी हल्ला होऊ शकतो असेही पाकिस्तानला दाखवायचे आहे. कश्मीरी जनतेच्या मतान भिती घालण्यासाठी पकिस्तान गोळीबार, ग्रेनेड हल्याची तयारी करत आहेत. सुरक्षादलाच्या ताफ्यावर आणि चौक्यांवर आत्मघातकी हल्ला करण्याची तयारीही पाकिस्तान करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या