जेट एअरवेजचे शेअर्स 8 टक्क्यांनी कोसळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेले तीन महिन्यांपासून पगार रखडल्यामुळे जेट कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सुरू केलेल्या उड्डाण बंद आंदोलनमुळे मंगळवारी जेट एअरवेजचे समभाग 8 टक्क्यांनी कोसळले. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी जेट व्यवस्थापनाची बैठक झाली. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही.

प्रभूंनी घेतला आढावा
जेट कर्मचाऱ्यांच्या कालपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली असून नागरी उड्डाण सचिव प्रदीप सिंग यांच्याकडून माहिती घेतली जात असल्याचे प्रभूंनी सांगितले. आंदोलनासह वाढीव शुल्क आणि उड्डाणे रद्द करण्याच्या मुद्द्य़ांची माहितीही मागवली गेली आहे.

नरेश गोयल यांची लिलावातून माघार
जेटचे माजी अध्यक्ष नरेश गोयल हे सुद्धा जेट एअरवेजच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता ते जेटच्या लिलावात भाग घेणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. जेटवर 8 हजार कोटींचे कर्ज आहे.