
यूपीच्या झाशी जिल्ह्यात एक लग्न धूमधडाक्यात पार पडलं. वधू-वरांनी एकमेकांना हार घातले. सप्तपदी झाली; मात्र एवढं सगळं झाल्यानंतरही वधू सासरच्या घरी गेलीच नाही. यामागचे कारण वाचून लोकांना धक्का बसला आहे.
ही घटना झाशी जिल्ह्यातील कोतवाली शहरातील अलीगोल खिरकी या परिसरात घडली आहे. येथे राहणाऱ्या आरती नावाच्या तरुणीचे प्रेम नगर परिसरात राहणाऱ्या राजकुमारसोबत या तरुणासोबत लग्न जुळले. 11 मार्च रोजी त्यांचा विवाह सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला. त्यावेळी वरात घेऊन मिरवणुकीसह वाजत गाजत राजकुमार आरतीच्या घरी पोहोचला. लग्नाचे सर्व विधी यथासांग पार पडले. निरोपाच्या वेळी आरती गाडीत बसरणार इतक्यात राजकुमारला चक्कर आल्यासारखे वाटले. त्याचे हात पाय ताठ होऊ लागले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या घरगुती उपचारांमुळे तो शुद्धीवर आला. घडलेला हा सर्व प्रकार पाहून अनिताने राजकुमारसोबत त्याच्या घरी जाण्यास नकार दिला. यामुळे या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले.
आरतीच्या कुटुंबियांनाही तिचे म्हणणे पटले. त्यामुळे त्यांनी तिला वरासोबत सासरी पाठवण्यास नकार दिला. आरतीचा भाऊ दीपक शाक्या याने सांगितले की, वराला आकडी येण्याचा आजार आहे. ही माहिती त्याच्या कुटुंबियांनी मुलीच्या नातेवाईकांपासून लपवून ठेवली. लग्नातील मिरवणुकीत घडलेल्या घटनेमुळे त्याचा आजार उघडकीस आला. यामुळे आता आमची बहिण आरती हिला आम्ही राजकुमारच्या घरी पाठवणार नाही.
या घटनेबाबत वराच्या नातेवाईकांनी सांगितले की, राजकुमार 3 दिवस झोपला नव्हता. त्यामुळेच त्याला चक्कर आली. त्याला आकडी येण्याचा त्रास किंवा आजार नाही. या घटनेबाबत वर आणि वधु दोन्ही पक्षाच्या मंडळींनी पोलिसांत ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


























































