पोलीस महासंचालक पदावरून हटवलं, आयपीएस अधिकाऱ्याने घेतला शेती करण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mv-rao-ips

झारखंडचे महासंचालक (डीजीपी) पद साभांळणाऱ्या एमवी राव यांनी आयपीएसची सरकारी नोकरी सोडून व्हीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरी सोडून आता शेती करणार आहेत. नोकरी सोडून आता आपल्या गावी म्हणजेच आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे जाऊन वडिलोपार्जित शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

आपला कामगिरीमुळे झारखंडमध्ये चर्चेत राहिलेले आयपीएस अधिकारी एमवी राव राज्याचे के प्रभारी डीजीपी होते. 11 महिने ते या राज्याच्या पोलीस विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहात होते. 11 फेब्रुवारी रोजी त्यांना रात्री डीजीपीच्या पदावरून हटवण्यात आले आणि त्यांच्या जागी नीरज सिन्हा यांची वर्णी लागली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या एमवी राव यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा अजून सहा महिन्यांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी अचानक स्वेच्छा सेवा निवृत्तीचा निर्णय घेतल्याने साऱ्यांनाच प्रश्न पडला. झारखंडच्या निर्मितीआधी बिहारच्या जहानाबाद मध्ये एएसपी ते झारखंडचे डीजीपी असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

एमवी राव यांना आपल्या 34 वर्षाच्या करियरमध्ये बिहारमध्ये भागवत झा आजाद, जगरनाथ मिश्रा, लालू प्रसाद यादव ते झारखंडचे हेमंत सोरेन सरकार अशा विविध सरकारांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांचा कारभार सांभाळला आहे.

डीजीपी पदावरून हटवण्यात येण्यावरून एमवी राव यांनी मीडिया समोर काही सांगितले नाही.