
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 81 जागांसाठी मतमोजणी सुरू असून दुपारी तीनपर्यंत आलेल्या निकालांवरून काँग्रेस आणि मित्रपक्ष स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. सध्या काँग्रेस आणि मित्रपक्ष 45 जागांवर आघाडीवर असून भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता असून राज्यात सत्तांतर होणार हे स्पष्ट दिसत आहे. मात्र मुख्यमंत्री रघुवर दास यांनी झारखंडमध्ये आम्हीच सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे.
#JharkhandResults दीड वर्षात भाजपने महाराष्ट्रासह 7 राज्य गमावली
राज्यातील निवडणूक निकालाबाबत अद्याप हाती आलेल्या कलावर प्रतिक्रिया देताना रघुवर दास यांनी कल म्हणजे अंतिम शब्द नाही, मतमोजणी अद्याप बाकी आहे. या कलावर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. मी नंतर रांची येथे पत्रकारपरिषद आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, सरयू राय यांच्याकडून कोणताही धोका नाही, मला अद्यापपर्यंत ती मते मिळाली नाहीत, जी मला देण्यात आलेली आहेत. याचबरोबर आम्ही केवळ जिंकणारच नाही तर राज्यात सरकार देखील स्थापन करू, असा विश्वास रघुबर दास यांनी व्यक्त केला.
Jharkhand CM & BJP candidate from Jamshedpur East: Had Saryu Rai caused damage, I would not have received the votes, which I did so far. Let me clearly state that we’re not only winning but we’ll also form govt under the leadership of BJP in the state. #JharkhandAssemblyPolls https://t.co/6OvpA2PYlY
— ANI (@ANI) December 23, 2019
इतिहास बदलणार?
झारखंडच्या इतिहासात एकदा मुख्यमंत्री झालेली व्यक्ती सत्तेत असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आलेली नाही. यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री असलेले बाबूलाल मरांडी, शिबू सोरेन, हेमंत सोरेन, अर्जुन मुंडा आणि मधु कोडा हे एकदा मुख्यमंत्री बनल्यानंतर पुन्हा पुढच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे रघुबर दास हा इतिहास बदलणार का याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.

























































