
रिलायन्स जियो फायबरची ब्रॉडबँड सेवा प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. जियोच्या अनेक प्लान्समध्ये ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. त्यापैकी एक म्हणजे जियोच्या प्लॅनसोबत नेटफ्लिक्सची मेंबरशिपही मिळत आहे.
हिंदुस्थानसह जगात नेटफ्लिक्स एक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. नेटफ्लिक्सची मेंबरशीप 200 रुपयांपासून सुरू होते. बर्याच वेळेला ही मेंबरशीप ग्राहकांना परवडत नाही, तेव्हा काही टेलिकॉम कंपन्यांनी ओटीटी सबस्क्रिप्शनची ऑफर दिली आहे.
नेटफ्लिक्स मेंबरशीप आणि जियो फायबर प्रीपेड प्लॅन
जियोचा बेसिक प्लॅन 1 हजार 499 पासून सुरू होतो. त्यात नेटफ्लिक्ससह प्राईम व्हिडीओ, डिस्नी+हॉटस्टार या ओटीटीची मेंबरशीप दिली जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 MBPSच्या स्पीडसह अनलिमिटेड डेटा मिळतो.
त्यानंतर 2499, 3999 आणि 8499 चे जियोचे प्लॅन आहेत. त्यात अनुक्रमे 500 MBPS, 1 GBPSची स्पीड दिली जाते. तसेच 4497, 11 हजार 997 आणि 25 हजार 497 चे तीन महिन्यांची वैधता असलेल्या प्लॅनमध्येही नेटफ्लिक्सची मेंबरशीप मिळते.
नेटफ्लिक्स मेंबरशीप आणि पोस्टपेड प्लॅन
जियो फायबरमध्ये पोस्टपेड प्लॅनमध्ये सहा महिने आणि एक वर्षाची वैधता असलेले असे दोन प्लॅन्स आहेत. दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना नेटफ्लिकची मेंबरशीप मिळते. त्यात 8 हजार 994, 14 हजार 994, 23 हजार 994 आणि 50 हजार 994 रुपयांचे प्लॅन्स येतात. त्यात अनुक्रमे 500 MBPS, 1 GBPS, ची स्पीड मिळते.































































