जियोचा डॅमेज कंट्रोल, युझर्जना 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम

12500

गेल्या आठवड्यात जियोने आपल्या ग्राहकांना चांगलाच दणका दिला होता. जियोने प्रतिमिनिट सहा पैसे आकारण्याची घोषणा केली. त्यामुळे जियोच्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती. आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जियोने नवीन शक्कल लढवली आहे.

जियोचा रीचार्ज केल्यानंतर ग्राहकांना आता 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळणार आहे. या संदर्भात जियोने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार काही ग्राहकांनी रिचार्ज केल्यानंतर त्यांना 30  मिनिटाच्या फ्री टॉकटाईमचा मेसेज आला आहे. या टॉकटाईमची वैधता एक आठवडा असणार आहे.

9 ऑक्टोबर रोजी जियोने आऊटगोईंग कॉलला सहा पैसे आकारण्याची घोषणा केली. तेव्हा अनेकांनी जिओ मोबाईलमधून पोर्ट करण्याची धमकी दिली. ट्विटरवर अनेकांनी #boycottJio असा हॅश टॅगही ट्रेंड केला होता. त्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेल, आयडीया आणि व्होडाफोन सारख्या कंपन्यांनी त्यात हातही धुवून घेतले. सर्व आऊटगोईंग कॉल फ्री असतील अशी घोषणा तीनही कंपनीने केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या