जियोचा पोस्टपेड प्लॅन लॉन्च; नेटफ्लिक्स, ऍमेझॉन आणि डिस्ने हॉटस्टारचे मिळणार सबस्क्रिप्शन

काही दिवसांपूर्वी जियोने फ़ायबर इंटरनेटचा प्लॅन जारी केला होता. त्या प्लानमध्ये 100 MBPS स्पीड नेटसह अनेक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देण्यात आले होते. आता जियोने पोस्टपेड प्लॅन लॉन्च केला आहे. त्यातही जिओने नेटफ्लिक्स, ऍमेझॉन आणि डिस्ने हॉटस्टरचे सबस्क्रिप्शन दिले आहे. तसेच कॉलिंगचे मोठे फायदे या प्लॅनमध्ये सणार आहे.

जियो पोस्टपेडचा प्लॅन 399 पासून सुरू होतो. त्यानंतर 599, 799 आणि  1499 पर्यंत प्लॅन आहेत. या सर्व प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि एसमएस सेवा मिळणार आहे. तसेच नेटफ्लिक्स, ऍमेझॉन आणि डिस्ने हॉटस्टारची मेंबरशिप मिळणार आहे.

जियोचा Entertainment Plus प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स, ऍमेझॉन्र प्राईम आणि डिस्ने हॉटस्टारची मेंबरशिप मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये जियो ऍपचा फायदा मिळणार असून त्यात 650 पेक्षा अधिक लाईव्ह चॅनेल्स, व्हिडीओ कंटेट, पाच कोटी गाणी आणि 300 हून अधिक वृत्तपत्र वाचायला मिळणार आहे.

Features Plus

या प्लॅनमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी माणशी 250 रुपयाने कनेक्शन मिळणार आहे. त्यात 500 GB पर्यंत इंटरनेट डेटा आणि वायफार कॉलिंग सेवेचा पर्याय आहे.

599 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 हीबी डेटा मिळणार आहे. तसेच नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम आणि डिस्ने हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 GBचा रोल ओअवर डेटा मिळणार आहे. रोल ओवर डेटा म्हणजे एखाद्या महिन्यात ग्राहकाने त्याचे पूर्ण इंटरनेट वापरले नाही तर उरलेले डेटा त्यांना पुढच्या महिन्यात वापरायला मिळेल. यामुळे ग्राहकांचा डेटा वाया जाणार नाही.

799 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 150 GB डेटा मिळणार आहे. तसेच नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम आणि डिस्ने हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. 200 GBचा रोलओवर डेटा आणि फॅमिली प्लॅनमध्ये दोन एक्स्ट्रा सिम कार्ड मिळणार आहेत.

999 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 GBचा डेटा मिळणार आहे. तसेच नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम आणि डिस्ने हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तर 500 जीबींचा रोल ओअवर डेटा मिळणार आहे. तसेच फॅमिली प्लॅनमध्ये 3 एक्स्ट्रा सिम मिळणार आहेत.

1499 रुपयांचा प्लॅन आणि 500 GBचा रोलओवर डेटा

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 GBचा डेटा मिळणार आहे. तसेच नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम आणि डिस्ने हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तर तब्बल 500 जीबींचा रोलओवर डेटा मिळणार आहे. तसेच अमेरिका आणि युएई या देशांसाठी अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलची सुविधा असणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या