राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यावरूनच विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना “केम छो शिंदेसाहेब, सारो छे ना?” असं म्हणत टोला लगावला.