मराठी माणसाच्या राशीला हे ‘भाज्यपाल’ नकोत! जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. यामुळे आता राजकीय वातावरण तापलं असून. विविध स्तरातून राज्यपालांचा निषेध होत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपालांचा निषेध केला आहे. हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीला नकोत! असं ट्विट करत आव्हाडांनी कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत. की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचंक गुंडाळ. असे ट्विट आव्हाडांनी केलं आहे.

तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हीरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हीरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुनेपुराणे झाले. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नितीन गडकरी हे तुमचे आताचे आदर्श आहेत. असे वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवीदान समारोह काल पार पडला. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी देखील उपस्थित होते. यावेळी भाषणात कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केलं.