72 तासात माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत गेल्या 72 तासांत त्यांच्या विरोधात दोन खोटे गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप महिला कार्यकर्तीने विनयभंगाची तक्रार केली आहे. या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात समोर आलेल्या त्या महिलेला आव्हाड बाजूला करताना दिसत आहेत.


”पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात 2 खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत” असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.