
जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर मध्ये हरी सिंह हाईट स्ट्रीटजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे सध्या जम्मू-कश्मीरमध्ये कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
पण असे असतानाही ही सुरक्षा व्यवस्था भेदून दहशतवाद्यांनी हा ग्रेनेड हल्ला केला. यामुळे जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उगारले जात आहे.
























































