
जेएनपीटीने दिनांक 16 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान “स्वच्छता पंधरवडा” साजरा केला. यासाठी अनेक स्वच्छता उपक्रम दैनंदिन तत्वावर राबवले गेले. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त हाती घेण्यात आलेला सर्वात महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे पोर्टवरच्या विस्तीर्ण घनकचरा प्रक्रिया सुविधेच्या कामासाठी देण्यात आलेला पुरस्कार होय. जेएनपीटी घनकचरा व्यवस्थापन नियम 2016नुसार घनकचरा प्रक्रिया सुविधेच्या विकासासाठी उपक्रम आयोजित करणारे हिंदुस्थानातील महत्वाच्या बंदरांपैकी पहिले बंदर आहे.
युनिटची 10एमटी/दिवस घन कचरा प्रक्रिया क्षमता असून, तिचा उपयोग बंदर, बंदराचे उपयोगकर्ता आणि पोर्टच्या क्षेत्रात येणाऱ्या करळ, सोनारी, सावरखार आणि जसखार सारख्या ग्रामपंचायतींसाठी केला जाणार आहे. घरोघरी जाऊन घन कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी घंटा गाड्यांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करता यावा म्हणून पार्टिशन दिले जाणार आहे. सद्यस्थितीत 6 एमटी प्रति दिन एवढा घनकचरा तयार होतो आणि बायोगॅस प्रकल्पाद्वारे तयार केल्या जाणाऱ्या बायोगॅसचा उपयोग कार्यांदरम्यान केल्या जाणाऱ्या वीज निर्मितीसाठी होणार आहे.
प्रक्रियेमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या, पेपर, कार्डबोर्ड, आवरणे, खाद्यपदार्थांच्या पिशव्या, पॉलिथीनच्या पिशव्या, ब्लिस्टर्स, अनेक थर असलेल्या बॅगा इत्यादीच्या प्रक्रियेसाठी हायडॉलिक बॉलिंग प्रेस मशिनच्या स्थापना करण्याचा देखील समावेश आहे. डिवॉटरींग सुविधेसोबत डिकॅंटेर सेंट्रिफ्युज टाकाऊ पदार्थांच्या प्रक्रियेसाठी गाळ आणि पाणी वेगवेगळे करणार असून गाळाचा उपयोग बागकामासाठी कंपोस्ट म्हणून केला जाणार आहे.
या व्यतिरिक्त बंदराने सांडपाण्याचे रिसायकलिंग करण्याच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ऍडेप्टचे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आधीच कमिशनिंग केले आहे. सद्य स्थितीत बंदरात सरासरी 2एमएलडी प्रति दिन रिसायकल केलेल्या पाण्याचा बागकामासाठी उपयोग केला जातो, म्हणजेच अंदाजे 60 एमएलडी ताजे पाणी दर महिन्याला वाचते. पाण्याच्या रिसायकलिंगमुळे ताज्या पाण्याच्या वापराचा भार कमी करुन, जल संवर्धन करण्यात महत्वपूर्ण हातभार लावला आहे, ही आजमितीला देशाला भेडसावणारी सर्वात गंभीर समस्या आहे.
या स्वच्छता पंधरवड्यात दरम्यान सर्व जेएनपीटी कर्मचारी आणि शालेय मुलांना स्वच्छतेची शपथ दिली जाणार आहे. जेएनपीटीच्या परिसरात सर्व विभाग, हॉस्पिटल, शाळा, स्टोर्स आणि ऑटो गॅरेजचा समावेश होणाऱ्या ऑफिस परिसराला स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले जाणार आहे. स्वच्छता राखण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी साइन बोर्ड लावले जातील. जुन्या फाइल्स काढून टाकल्या जाणार आहेत. घरोघरी फिरुन अधिक चांगल्या स्वच्छता सवयी आणि नियमीत स्वच्छतेची खात्री देण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी अभियान राबवले जाणार आहे. जेएनपीटीच्या शहरीभागात टाकाऊ कचरा संकलन उपक्रम आणि कचऱ्याच्या जैवविघटक असलेल्या आणि नसलेल्या वर्गीकरणाबद्दल जागरुकता निर्माण केली जाईल. घनकचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाईल, वृक्षारोपण उपक्रम राबवला जाईल.
स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करण्यासाठी स्ट्रीट प्ले केले जातील. निबंध, घोषवाक्य आणि पोस्टर तयार करण्याच्या स्पर्धा जेएनपीटी शाळेच्या मुलांसाठी स्वच्छतेच्या थीमवर आयोजित केल्या जातील.
जेएनपीटी शाळेच्या मुलांनी केलेल्या टाकाऊमधून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाईल. आरोग्य, स्वच्छता आणि नीटनेटकेपणावर स्त्रियांसाठी सत्राचे आयोजन केले जाईल. जेएनपीटीच्या शालेय मुलांमार्फत सायकलिंग रॅली आयोजित केली जाईल.
बंदराच्या परिसरातील स्वच्छता प्रकल्पाच्या व्यतिरिक्त जेएनपीटी अधिकारी पूराने बाधित झालेल्या जवळपासच्या गावांमध्ये रस्ते, गटारांच्या स्वच्छतांसंबंधि विशेष पावले उचलतील आणि कचरामुक्त रस्ते आणि सार्वजनिक मैदानांना राखण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले जाणार आहे.
या स्वच्छता अभियान पंधरवड्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांसाठी जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी सर्व कर्मचारी, स्टेकहोल्डर्स, सीआयएसएफ, जेएनपीटी शाळा कर्मचारीवर्ग आणि मुलांचे स्वच्छता पंधरवडा यशस्वी करण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी अभिनंदन केले आहे. त्यांनी सर्व कर्मचारी आणि जेएनपीटी टाऊनशीपच्या तसेच जवळपासच्या गावांमधल्या सर्व रहिवाश्यांना प्रत्येकाने स्वच्छता ही केवळ स्वच्छता कर्मचा-यांचीच नव्हे तर आपली देखील जवाबदारी मानून तिला हाती घेण्याची विनंती केली. यामुळे “स्वच्छ जेएनपीटी, स्वच्छ भारत” या उद्देशाला साध्य करता येऊ शकेल , अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.



























































